केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार उद्या आणि परवा जिल्ह्यात!

 
756
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार उद्या २१ एप्रिल रोजी जिल्ह्यात येणार आहेत. उद्या रात्री ८ वाजता त्या औरंगाबादवरून चिखली येथे पोहचणार आहे. चिखलीत मुक्कामी थांबल्यानंतर परवा ,२२ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता शासकीय वाहनाने धाडकडे प्रयाण करतील.
अल्पावधीत नावारूपाला आलेल्या व श्वेताताई महाले पाटील अध्यक्ष असलेल्या  तोरणा महिला अर्बनच्या धाड शाखेचे उद्घाटन सकाळी १० वाजता त्यांच्याहस्ते होणार आहे. सकाळी ११ वाजता धाडवरून चिखलीकडे प्रयाण करणार असून साडेअकरा वाजता त्या जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. दुपारी अडीच वाजता त्या नाशिककडे प्रयाण करतील.