केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आज बुलडाणा शहरात! कसा आहे दौरा; कुणाकुणाला भेटणार, काय करणार वाचा...

 
yadav
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा प्रवास योजनेच्या निमित्ताने बुलडाणा लोकसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आज, १९ सप्टेंबरला बुलडाणा शहरात येत आहेत. काल, १८ सप्टेंबर रोजी त्यांनी घाटाखालील विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतला. त्यानंतर आज, ते जिल्हा मुख्यालयी येणार आहेत.
जाहिरात

yadav

संध्याकाळी साडेचार वाजता भूपेंद्र यादव बुलडाणा शहरात पोहचतील. मलकापूर रोडवरील बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी जवळ भाजपच्या नियोजित जिल्हा कार्यालयाच्या जागेची ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात  ते विकास कामांसंबधी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. ६:१५ वाजता ते पत्रकारांशी वार्तालाप करणार असून ७ वाजता भाजपचे जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.

साडेसात वाजता ते संभाजीनगर कडे रवाना होतील. या दौऱ्यात त्यांच्यासोबत बुलडाणा लोकसभा प्रभारी खा. अनिल बोंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. आकाश फुंडकर, आ. संजय कुटे,आ. श्वेताताई महाले, जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे राहणार आहेत.