केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवांनी केले योगेंद्र गोडेंच्या कार्याचे कौतुक! म्हणाले, और अच्छा करो, आगे बढो!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा प्रवास योजनेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव दोन दिवसांचा लोकसभा दौरा करून गेले. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांपासून ते जिल्हा आणि प्रदेश पातळीवर काम करणाऱ्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. पक्ष मजबुतीसाठी आवश्यक असलेल्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान या दौऱ्याचा गोड शेवट त्यांनी भाजपचे जिल्हा महामंत्री गोडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन केला. यावेळी गोडे परिवाराने जल्लोषात केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत केले.

१९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषद व आढावा बैठक आटोपल्यावर भूपेंद्र यादव यांनी यागेंद्र गोडेंच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी यादव यांनी गोंडेच्या शैक्षणिक ,सामाजिक व राजकीय कार्याचे कौतुक केले. और अच्छा करो आगे बढो असेही श्री. यादव गोडेंना म्हणाले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, आमदार श्र्वेताताई महाले पाटील, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार शशिकांत खेडेकर, भाजपचे शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सोहम झाल्टे, युवा मोर्चा शहर सरचिटणीस मोहित भंडारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.