सत्तेत असूनही आमदार संजय गायकवाडांवर आंदोलन करण्याची वेळ! ४ डिसेंबरला करणार रास्तारोको; वाचा काय आहे कारण..!
Dec 2, 2022, 16:48 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मोताळा शहरातील मुख्य मार्ग मोताळा - नांदुरा आठवडी बाजार मार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. या रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आ.संजय गायकवाड ४ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. सत्तेत असूनही आ. गायकवाडांवर रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे रस्त्याचे काम आ. गायकवाडांनी रस्त्याचे काम मंजूर करून त्यासाठी निधीची तरतूद देखील केली आहे. मात्र असे असतांना ठेकेदार व संबधित अधिकारी वर्ग यांच्या नाकर्तेपणामुळे रस्त्याचे काम रेंगाळलेले आहे. त्यामुळे आ. गायकवाड हे स्वतः ४ डिसेंबरला आठवडी बाजारात रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.