हजारो कृषी पदवीधरांचा धिरज लिंगाडेंना पाठींबा; डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लिंगाडेंच्या प्रचारार्थ पार पडले चर्चासत्र; आ.

 अमोल मिटकरी म्हणाले भाजपचा कावा ओळखा; लिंगाडेंनी दिला कृषी पदवीधरांच्या समस्या सोडविण्याचा शब्द
 
Ttui
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपच्या उमेदवाराला पदवीधरांच्या समस्यांचे देणेघेणे नाही. १२ वर्षात त्यांनी काय दिवे लावले हे सर्वांना माहीत आहे. आता पुन्हा खोटी आश्वासने देऊन ते पदवीधरांना मताचे दान मागत आहे. व्यक्तिगत स्वार्थासाठी अन् सत्तेसाठी  हपापलेल्या भाजप उमेदवाराचा कावा ओळखा आणि पदवीधरांच्या समस्यांची जाण असलेल्या धिरज लिंगाडे यांना सभागृहात पाठवा असे आवाहन विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागात  महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्या प्रचारार्थ आज, २४ जानेवारीला चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते, यावेळी अमोल मिटकरी बोलत होते.यावेळी उमेदवार धिरज लिंगाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव तथा अकोला महानगर कॉंग्रेस प्रभारी  धनंजय देशमुख, डॉ अभय दादा, निखिलेश दिवेकर,महेश गणगणे,कपिल रावदेव,अंशुमन देशमुख,सागर कावरे, रविंद्र तायडे,राहुल इंगोले तसेच कृषी अभियांत्रिकी विभातील सर्व अधिकार,कर्मचारी व कृषी पदवीधर उपस्थित होते.

पदवीधर मतदारसंघाच्या विद्यमान आमदाराचा गत १२ वर्षाचा कार्यकाळ म्हणजे फ्लॉप शो होता असा घणाघात यावेळी मिटकरी यांनी करीत पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी धिरज लिंगाडे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

     कृषी पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द : धिरज लिंगाडे

      कृषी पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे असा शब्द यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार लिंगाडे यांनी दिला. गत चार वर्षांपासून कृषी सेवक भरती झाली नाही, मात्र कृषी पदवीधरांच्या प्रश्नांवर बोलायला सध्याच्या आमदारांना वेळ मिळाला नाही असे यावेळी लिंगाडे म्हणाले. एमपीएससी द्वारे मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपअधीक्षक ही भरल्या जातात, मात्र  आयोगाने आता  परीक्षा पद्धतीत बदल करून वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. आयोगाचा हा निर्णय हजारो कृषी पदवीधरांवर अन्याय करणारा आहे. तशी पूर्वसूचना किमान दोन वर्षे आधी आयोगाने द्यायला हवी होती. परीक्षा पद्धतीत बदल करायचाच असेल तर तो २०२५ पासून करण्यात यावा आदी मागण्या मान्य करून घेण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचा शब्दही लिंगाडे यांनी यावेळी दिला. मोठ्या संख्येने कृषी पदवीधरांची उपस्थिती यावेळी होती.