आवाज शिवसेनेचा! मुलुखमैदानी तोफ पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जिल्ह्यात! हिंदुगर्वगर्जना यात्रेला संबोधित करणार! मेहकर, चिखली, जळगाव जामोद मध्ये उसळणार भगवी लाट!

 

tgfj

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज, १ ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शिवसेनेच्या हिंदु गर्व गर्जना यात्रेच्या निमित्ताने आयोजित ३ संभांना ते संबोधित करणार आहेत. मेहकर , चिखली , जळगाव जामोद येथील संभांना मंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर संबोधित करणार असून बुलडाणा येथे होणाऱ्या सभेला आमदार संजय गायकवाड संबोधित करणार आहेत. एकाच दिवसात होणाऱ्या या चारही संभांना जनसागर लोटणार असल्याने आज जिल्हाभर भगवी लाट उसळणार आहेत. या हिंदु गर्व गर्जना यात्रेला हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचे आवाहन खा. प्रतापराव जाधव, आ.संजय रायमुलकर, आ.संजय गायकवाड यांनी केले आहे.
    
 मेहकर येथील सभा आज सकाळी १० वाजता कृषी वैभव लॉन येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता चिखली येथील मौनीबाबा संस्थान येथे दुसरी तर तिसरी संभा सायंकाळी ५ वाजता जळगाव जामोद येथे पार पडणार आहे. याशिवाय सकाळी साडेनऊ वाजता बुलडाणा येथील सभेला आ.संजय गायकवाड संबोधित करणार आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. प्रतापराव जाधव , शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर, यांच्यासह आ. संजय गायकवाड, आ. संजय रायमुलकर या संभांना उपस्थित  राहणार आहेत.  या चारही संभांना अलोट गर्दी उसळण्याची शक्यता असल्याने जिल्हा पोलीस दलाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे.