'पीरिपा' च्या मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची ठरणार रणनिती ! 'लॉंग मार्च'कार प्रा. कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांची प्रमुख उपस्थिती!
बुलडाण्यात उद्या स्वाभीमान मेळावा
बुलडाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित स्वाभीमान मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेशभाई उन्हवणे हे राहणार असून यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय महामंत्री जे. के. नारायणे, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी गोपाल आटोटे , गणेश पडघन , प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, उपाध्यक्ष जगन सानवणे, उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे, मुंबई कार्याध्यक्ष भाई विजय निकाळे, प्रदेश संघटक कपिल लिंगावत, प्रदेश अध्यक्ष विजय वाघमारे, युवा आघाडी महासचिव सोपान पवार, सरचिटणीस अनिल तुरुकमारे, जिल्हा कार्याध्यक्ष गौतम कासारे, महिला आधाडी विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुवर्णा वानखेडे, जिल्हाप्रवक्ता संजय निकाळजे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
चिखली तालुका संघटक मौसीन शेख, जिल्हा संघटक गजानन साठे, जिल्हा नेते सर्जेराव गोरे, बुलडाणा शहर नेते योगेश आंभोरे, बुलडाणा शहर अध्यक्ष निलेश बोरकर, जगनभाई सोठावणे, चिखली शहर सचिव संघर्ष तरकसे, शहर उपाध्यक्ष अनिल सावळे, बुलडाणा शहर संघटक सलमान खान, रणजीत खिल्लारे, अमोल गवई , सिध्दार्थ साळवे, सिध्दार्थ खंडारे, कंकाळ सर, मधु भिसे, गौतम राजे निलेश जाधव, शुभम गायकवाड, सतीश कांबळे आदि मान्यंवर उपस्थित राहणार आहेत.
विजय गवई म्हणाले की, लवकरच महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर पालीकांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. या निवडणूकामध्ये पक्षाची भुमिका काय राहील, यासंदर्भात कार्यकार्त्यांची मते जाणू घेण्यासाठी तसेच इतरही विषयावर मेळाव्यात मंथन होणार आहेत. राज्यभरात गायरान जमीनीवर अतिक्रमण करुन उदरनिर्वाह करणाऱ्या अतिक्रमणधारकांना कायमचे पट्टे देण्यात यावे, बहुजन समाजातील सुशिक्षीत महिला व युवकांना रोजगाराविषयक मार्गदर्शन मिळावे, दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासंदर्भात भुमिका घेण्यासाठी तसेच बुलडाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथे नुकत्याच घडलेल्या पारवे कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी पारवे कुटुंबांना न्याय मिळावा याव ईतर विषयावर प्रा. कवाडे सर आपली भुमिका मांडणार आहेत असेही ते म्हणाले.