चिखलीत उद्या उसळणार भगवा जनसागर! उद्धव ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी; ५० अधिकारी अन् ४०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात! अप्पर पोलीस अधीक्षकांनी घेतला सुरक्षेचा आढावा

 
zp
बुलडाणा( अनंता काशीकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भव्य जाहीर सभा उद्या, २६ नोव्हेंबरला चिखलीत पार पडणार आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून पोलिस प्रशासनाच्या वतीने सुद्धा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज,२५ नोव्हेंबरला अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

         jadhav

         जाहिरात☝️

चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर हा शेतकरी संवाद मेळावा होणार आहे. बंडानंतर प्रथमच उध्दव ठाकरे मुंबईच्या बाहेर पडणार असून दसरा मेळाव्यानंतर ते पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित करणार असल्याने चिखलीच्या सभेकडे साऱ्यांच्या नजरा लागून आहेत. जिल्ह्यातील १ खासदार आणि २ आमदार बाळासाहेबांच्या शिवसेनेत गेल्याने जिल्ह्यात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात लोकप्रतिनिधींची वानवा आहे.

    jadhav

         जाहिरात☝️

मात्र असे असले तरी संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी पुन्हा संघटन उभारले आहे. जिल्ह्यात याआधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ,आदित्य ठाकरे यांच्या सभा सुद्धा पार पडल्या. त्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता उद्या थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरणार असल्याने ते  उद्या काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.