पालिकेतील अस्थायी कर्मचाऱ्यांच्या वारसांचा प्रश्न गाजला!आ.गायकवाड यांनी लावून धरली मागणी

 
hbvf
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नगरपालिकेतील अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या व सफाई कामगारांच्या  वारसाबाबत आ. संजय गायकवाड यांनी  प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले.

या विषयावर बोलताना आ. गायकवाड म्हणाले की, १२ ऑगस्ट १९७५ रोजी झालेल्या लाडपागे समितीच्या शिफारशीवरून सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.परंतु १९७५ पूर्वीच्या लोकांना या शिफारशीचा फायदा मिळत नाही. तो फायदा त्यांना देण्यात येणार का? हा पहिला प्रश्न २९ डिसेंबर रोजी आ.संजय गायकवाड यांनी उपस्थित केलाय.

तसेच दुसरा प्रश्न उपस्थित करताना  ते म्हणाले की, नगरपरिषदेमध्ये अस्थायी स्वरूपात १९९३ पूर्वी जे लोक कामावर होते, त्या लोकांना एक वेळची विशेष बाब म्हणून राज्य सरकारने सगळ्या लोकांना सामावून घेतलं.त्या लोकांच्या वारसांना देखील लाडपागे समितीची शिफारस लागू होत नाही. त्यांना देखील ही शिफारस लागू होणार का? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय. दरम्यान गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले की, या समितीचे अध्यक्ष मा.उपमुख्यमंत्री हे आहेत. त्यामुळे समितीचा अहवाल आल्यानंतर जे सगळे विषय त्याच्यामध्ये आहे ते अहवाल आल्यानंतर कॅबिनेट समोर आम्हाला जाता येईल. त्यानंतर कॅबिनेट समोर गेल्यानंतर हे सर्व विषय मान्य होतील असे आश्वासित करण्यात आले आहे.