बुलडाण्यातील गुंडांना पोलिसांचे पाठबळ! "त्या" धंद्यांना जिल्हा पोलिस अधीक्षकच जबाबदार! माजी आमदार हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप!

 
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहराची ओळख शांतताप्रिय आणि सांस्कृतिक शहर अशी आहे. मात्र अलीकडच्या काळात गुंडगिरी, दमदाटी आणि हेकेखोरीचे प्रमाण वाढत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. बुलडाण्याची सांस्कृतिक परंपरा आता मोठ्या संकटात सापडली आहे. या अराजकतेला पोलीस विभाग आणि जिल्हा पोलिस अधीक्षक हेच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. 

बुलडाणा शहरातील  गुंडगिरी आणि वाढत चाललेल्या अवैध धंद्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचेही सपकाळ म्हणाले. बुलडाणा शहराची सांस्कृतिक परंपरा जपत चांगलेपणा जोपासला जावा असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.