स्वातंत्र्यापूर्वीपासून प्रलंबित खामगाव-जालना रेल्वेचा मुद्दा अमृतमहोत्सवी वर्षात प्रथमच राज्यसभेत ! खा. मुकुल वासनिकांचा पहिलाच प्रश्न कर्मभूमीवर!! रेल्वे मंत्री म्हणाले निर्धारण सर्वेक्षण सुरू

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यसभेचे खासदार मुकुल वासनिक यांनी सभागृहात आपला पहिला महत्वाचा प्रश्न उपस्थित करताना आपल्या कर्मभूमी अर्थात मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला प्राधान्य  दिलंय !  त्यांनी राज्यसभेत  पारतंत्र्यापासून आजवर रखडलेल्या व नियोजित खामगाव ते जालना रेल्वे मार्गासंबंधी तारांकित प्रश्न उपस्थित केला.  या प्रश्‍नावर रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी उत्तर देतांना, 2021 मध्ये खामगाव ते जालना या नव्या रेल्वे मार्गासाठी अंतिम स्थान निर्धारण सर्वेक्षण स्विकृत केले गेले असून,  सर्वेक्षणाचे काम सुरु  असल्याची माहिती दिली.  या परियोजनेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुणवत्तेच्या आधारे पडताळणी करून  मार्गावर पुढे विचार करणे शक्य होईल असे लेखी उत्तर दिले आहे.

खा. मुकुल वासनिक यांनी तारांकित प्रश्‍न 215 अन्वये खामगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी एवूण 5 प्रश्‍न उपस्थित केले.  मराठवाडा व विदर्भाला जोडण्यासाठी प्रस्तावित जालनापासून खामगाव पर्यंतची एक रेल्वेलाईन तब्बल 5 दशकांपासून जास्त वेळेपेक्षा सरकारच्या विचारार्थ प्रलंबित आहे का? या रेल्वेलाईनचे सर्वेक्षण झाले आहे काय? जर झाले असेल तर त्यासंबंधीचे विवरण काय आहे? या परियोजनेला तातडीने पूर्ण करण्यासाठी सरकार प्राथमिकता देणार आहे काय? जर देणार नसेल तर त्याचे कारण काय?? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी दिलेल्या उत्तरात नमूद केले की, या रेल्वे मार्गासंबंधीचे विवरण सभा पटलावर सादर केले असून खामगाव ते जालना हा नियोजित रेल्वे मार्ग 155 किमीचा असून  त्याचे सर्वेक्षण 2011 - 12 ला पूर्ण झाले होते. त्या अनुषंगाने या नव्या रेल्वेमार्गासाठी 1027 कोटी रुपये विंमत निर्धारित करण्यात आली.  मात्र निधी व अन्य कारणा- अभावी या रेल्वेमार्गाची परियोजना पुढे वाढवली जाऊ शकली नाही. 2016-17 च्या पुंजी निवेश कार्यक्रमात या नव्या मार्गासाठी 3 हजार कोटी रुपये निर्धारित करण्यात आले.

मात्र महाराष्ट्र रेल्वे अवसंरचना विकास लिमिटेड, या राज्य सरकारच्या संयुक्त उद्यम वंपनी व रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उद्यम मोड अंतर्गत या परि-योजनेची सुरुवात करण्यासाठी काही पाऊले उचलली गेली नाहीत. आता खामगाव ते जालना परियोजनेचा सविस्तर अहवाल 2021 च्या नव्या मार्गासाठीच्या अंतिम स्थान निर्धारण सर्वेक्षण अंतर्गत स्वीकृत केला गेला आहे . यानिमित्ताने प्रथमच हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित झाला आहे.