जानेफळात ओसंडून वाहला शिवभक्तांचा उत्साह! काँग्रेस तालुकाध्यक्ष देवानंद पवार यांचे कावडधारकांना विशेष सहकार्य! जानेफळ पोलिसांनी केले महाप्रसाद वितरण

 
जानेफळ( अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): श्रावण सोमवार निमित्त काल, जानेफळात शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहतांना दिसला. परिसरातील अनेक गावचे कावडधारी गोमेधरच्या गौतमेश्वर संस्थान  येथून कावड धारकांची पायदळ वारी काढतात. यंदा जानेफळच्या युवकांनी पहिल्यांदाच गोमेधर ते जानेफळ कावड यात्रा काढली. बम बम भोलेच्या गजरात सकाळी गौतमेश्वर मंदिरात जलाभिषेक करून  कावडीत पाणी आणून जानेफळ पोलीस स्टेशनच्या आवारातील शिव मंदिरात अभिषेक करण्यात आला. जानेफळ पोलीस स्टेशनच्या वतीने शिवभक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तरुणांच्या वतीने काढण्यात आलेल्या या कावड यात्रेला मेहकर तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष देवानंद पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

जानेफळच्या नवयुवकांसह टायगर ग्रुप व देवा ग्रुपने या कावड यात्रेचे आयोजन केले होते. देवानंद पवार व शिवभक्तांसोबत अशोकराव उबाळे, नामदेवराव राठोड, तुकाराम चव्हाण, श्री जाधव यांनीसुद्धा पायदळ वारी करून शिवभक्तांचा उत्साह वाढवला. पोलीस ठाण्यात ठाणेदार राहुल गोंधे  यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी महाप्रसाद वितरण केले.