काँग्रेसच्या आंदोलनाने जयस्तंभ चौक दणाणला! कार्यकर्त्यांनी केला केंद्र सरकार अन महागाईचा निषेध
Fri, 5 Aug 2022

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महागाईच्या विरोधात बुलडाणा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने आज 5 ऑगस्टला स्थानिय जयस्तंभ चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी देण्यात आलेल्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणला.
या आंदोलनात विजय आंभोरे, सुनिल तायडे, दत्ता काकस, रवी पाटील , जाकीर कुरेशी, बंडू कळवाघे , अमीन , शेख मुजु, प्रवीण गाडेकर, सुनील पनपालिया, दीपक रिंढे, रवींद्र भाकरे, जीवन जाधव, योगेश परसे, ज्योत्स्ना जाधव, रियाज भाई, शेख आसिफ, शेख अफसर, गुड्डू मिर्झा अभय सोनुने, शेख राजा, नदीम ताहीर, कांता चव्हाण, सलीम भाई, रोहित गवई, सतीश परसे, निलेश हरकलं , राहुल साबळे यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले. यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.