मंत्री राजेंद्र गावित यांच्या पुतळ्याला बुलडाण्यात मारले जोडे !पुतळा फुंकण्याचा प्रयत्न अयशस्वी; धनगर समाज बांधव आक्रमक
लोकसभेत धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राजेंद्र गावित यांनी धनगरांना आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला. 'धनगराचा समावेश आदिवासीमध्ये होऊ शकत नाही. हा समाज आदिवासी समाजापेक्षा वेगळा आहे. हा समाज जमीनदार आहे. त्यामुळं जमीनदार समाजाला आदिवासी प्रवर्गात घेऊ नका, अशी विनंती त्यांनी केली.
परिणामी याचे पडसाद राज्यभर उमटत असून, निषेध व्यक्त होत आहे. आज तहसील चौकात ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनाने मंत्री गावित यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच पुतळा हिसकावून घेतला. दरम्यान गावित यांच्या प्रतिमेला पायदळी तुडविण्यात येऊन चपला व जोडे मारण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. या निषेध आंदोलनात सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदू लवंगे,विजय जुमडे, एकनाथ भोवटे, सागर जगताप, आत्माराम चौधरी,रामभाऊ जुमडे, सागर चिंचोळकर,भारत शेजवळ, ज्ञानेश्वर काळंगे, गजानन काळंगे,विठ्ठल दिवनाले, किसन साळवे यांनी सहभाग घेतला होता.