राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज बुलडाण्यात! काय काय करणार अन् कुठे कुठे जाणार वाचा..!

 
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री तथा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आज, ११ जून रोजी बुलडाणा 
जिल्ह्यात येणार आहेत. काल, मुंबईत राज्यसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतर ते रेल्वेने मलकापूरकडे निघाले. सकाळी  साडेपाचला ते मलकापुरात पोहचले .

jairat

सकाळी १० वाजता मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथे धनगर समाज बांधवांसाठी मंजूर असलेल्या घरकुलाच्या मंजुरीपत्राचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते बुलडाण्याकडे प्रयाण करतील. बुलडाणा शहरातील गर्दे हॉल मध्ये काँग्रेसच्या वतीने आयोजित ओबीसी संघर्ष मेळाव्याला ते हजेरी लावणार आहेत.  काँग्रेसचे मावळते जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

मेळाव्यानंतर दुपारी तीनला  ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार असून संध्याकाळी ५ ला ते पत्रकारांशी संवाद साधतील. संध्याकाळी साडेपाचला ते बुलडाण्यावरून धामणगाव बढे कडे प्रयाण करतील. मोताळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित सविंधान चेतना आणि पक्षप्रवेश कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. त्यानंतर रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी मलकापूर रेल्वेस्टेशन वरून विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.