राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे उद्या बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर! वाचा काय काय करणार अन् कुठे कुठे जाणार

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे सहकार मंत्री तथा भाजपचे नेते अतुल सावे उद्या म्हणजेच २५ डिसेंबरला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 

उद्या सकाळी ११ वाजता मलकापूर येथील पांडव मंगल कार्यालयात आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी साडेअकराला माझी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंती निमित्त आयोजित सेवा सप्ताहानिमित्त  विविध शासकीय योजनांच्या शिबिराला ते उपस्थित राहणार आहेत.

दुपारी १२ वाजता मलकापूर शहरातीलच कोठारी महाविद्यालयात माळी समाजाच्या उपवर  - वधु परिचय संमेलनाला सुद्धा ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी एकला पांडव मंगल कार्यालयात आयोजित त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या हस्ते निवनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते सायंकाळी ते नागपूर कडे रवाना होतील.