राजकीय ब्रेकिंग ! नगरपालिका प्रभागावर अनेकांच्या हरकती! वाचा कोणत्या पालिकेत किती हरकती..! उद्यापासून जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार सुनावणी...
सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने पालिकांचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम नव्याने जाहीर केला. त्यानुसार मागील काळात झालेल्या प्रभाग रचनेवर मागील १० ते १४ मे दरम्यान नागरिकांच्या हरकती व सूचना आमंत्रित करण्यात आल्या होत्या. रचनांवर मोठ्या संख्येने हरकती घेण्यात आल्याचे दिसून आले. बुलडाणा व मलकापूर पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनावर प्रत्येकी ११ हरकती नोंदविण्यात आल्या. या तुलनेत राजकीयदृष्ट्या संवेदनशील मेहकर, खामगाव व देऊळगाव राजा पालिकेत अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे प्रत्येकी ४ हरकती घेण्यात आल्या आहे. नांदुरा मध्ये एकही आक्षेप घेण्यात आला नाहीये! शेगाव, चिखली पालिकेच्या हरकतींची माहिती संध्याकाळी उशिरा पर्यंत उपलब्ध झाली नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
उद्या 'चौघांची' सुनावणी
दरम्यान ८ पालिकांच्या रचनेवर मोठ्या संख्येने हरकती घेण्यात आल्या आहे. यापैकी बुलडाणा, देऊळगाव राजा, मेहकर आणि मलकापूर मधील हरकतींवर उद्या १८ मे रोजी जिल्हाधिकारी सुनावणी घेणार आहे. शेगाव, जळगाव जामोद, खामगाव मधील हरकतीवर १९ तारखेला सुनावणी होईल. जिल्हाधिकारी कार्यालय सूत्रांनी ही माहिती दिली.