क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार उद्या जिल्ह्यात! "या" कारणामुळे दौऱ्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नजरा..

 
dfvbnm
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, पशुंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार उद्या,९ मे रोजी जिल्ह्यात येणार आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे या दौऱ्याकदे लक्ष लागून आहे.

 उद्या दुपारी १ वाजता चिखली येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांचे आगमन होणार आहे. १:३० वाजता चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उपबाजार समिती कार्यक्रमास ते उपस्थीत राहतील. दुपारी ३ वाजता अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज येथे वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी साडेचारला चिखली येथील शासकीय विश्रामगृहात ते पशूसंवर्धन विभागाची आढावा बैठक घेणार आहेत.

५ वाजता क्रीडा विभागाची आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर साडेपाचला ते काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. संध्याकाळी सहाला चिखली येथील जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या मागील मैदानात राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शंकरपटांचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. सव्वासातला चिखलीचा निरोप घेतल्यानंतर सव्वाआठला मलकापूरात पोहचतील. रात्री १० वाजता विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील..