महापुरुषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांविरोधातील बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! मेहकरात महाविकास आघाडी रस्त्यावर

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):भाजपच्या काही नेत्यांकडून होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात महाविकास आघाडी आणि समविचारी संघटना आक्रमक झाल्याने, त्यांनी पुकारलेल्या मेहकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भाऊराव पाटील या महापुरुषांनी देशाला घडवण्याचे काम केले आहे.मात्र त्याच महापुरुषांचा काही वाचाळवीर बेताल वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखवत आहेत. तरी सुद्धा भाजपा सरकार यांच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई करत नाही असा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने रस्त्यावर उतरून बंद पाळला. या बंदला राजकीय पक्ष, समविचारी पक्ष, संघटना यांनी पाठिंबा दिलाय. बंदमुळे मेहकर शहरात सकाळपासून शुकशुकाट होता.

यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस श्याम उमाळकर, मेहकर विधानसभा अध्यक्ष  अनंत वानखेडे,भिमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस कैलास सुखधाने, उद्धव ठाकरे गटाचे आशिष रहाटे यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा निषेध व्यक्त करत खरपूस समाचार घेतला.कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष देवानंद पवार, माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे, जिल्हा उपाध्यक्ष करीमखान, शहरअध्यक्ष पंकज हजारी, वसंतराव देशमुख, युनुसभाई पटेल,अडेलकर,   संदीप ढोरे, छोटु गवळी,संदीप वानखेडे,तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सदस्य भास्करराव काळे, जिल्हा उपाध्यक्ष आफताब खान, युवा जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख,तालुकाध्यक्ष सागर पाटील वानखेडे,शहरअध्यक्ष निसार अन्सारी,शहरउपाध्यक्ष सुमेर खान, राजू पाटील नवले,आसिरखान, कैलास सांवत,अरुण ठोकरे,रहिम गवळी आणि उद्धव ठाकरे यांच्यागटाचे उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, शहरप्रमुख किशोर गारोळे, युवासेना तालुकाप्रमुख  आकाश घोडे, विलास शिंदे,  संदीप गवई तर तथागत ग्रुपचे संदिप गवई, यांच्या सह शेकडो पदाधिकारी महाविकास आघाडीचे आणि समविचारी पक्षांचे पदाधिकारी या बंद मध्ये सहभागी झाले.