भारत जोडो यात्रेत जयश्रीताई शेळकेंच्या नेतृत्वात बचतगटांच्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग!

 
jyhg

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो पदयात्रेत दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या महिलांनी १९ नोव्हेंबर रोजी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नफरत छोडो, भारत जोडो, कोण चलेगा भाई कोण चलेगा.. हम चलेंगे भाई हम चलेंगे अशा घोषणा देत त्यांनी पदयात्रेत उत्साह भरला. भगवे फेटे आणि हिरव्या रंगाची साडी अशा पारंपरिक वेषभूषेतील महिलांनी सर्वांचे लक्ष वेधले. 

   shelke

भारत जोडो पदयात्रा १८ नोव्हेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यात पोहचली. शेगाव येथे खासदार राहुल गांधी यांची विराट सभा झाली. शनिवारी सकाळी ही पदयात्रा शेगाव येथून जळगाव जामोदकडे रवाना झाली. दरम्यान माटरगाव बु. येथे दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात बचतगटांच्या महिलांनी यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 नफरत छोडो, भारत जोडो..कोण चलेगा भाई कोण चलेगा.. हम चलेंगे भाई हम चलेंगे अशा जोरदार घोषणा देत भारत जोडो यात्रेत उत्साह भरला. पारंपारिक वेशभूषेतील महिलांनी सर्वांचे लक्ष वेधले. भजन गात आणि पावली खेळत महिलांनी आपला भरभरुन सहभाग दर्शवला. प्रदेश काँग्रेसच्या सचिव तथा दिशा बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके बाळापूरपासून भारत जोडो पदयात्रेत चालत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातुन ही पदयात्रा मध्यप्रदेशच्या हद्दीत प्रवेश करण्यापर्यंत त्या यात्रेत पायी चालणार आहेत.