जिल्ह्यातल्या २०० ग्रामपंचायतीवर शिवसेना भाजपा युतीचा झेंडा फडकणार! खा. प्रतापराव जाधवांचा दावा! लोकसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिल्यानंतर आता पुन्हा नवे चॅलेंज;

 म्हणाले, खरीप ,रब्बीच्या पिकांची यादी वाचून दाखवा मग शेतकरी मेळावे घ्या..!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातल्या २७९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी १८ डिसेंबरला मतदान होत आहे. २७९ पैकी कमीतकमी २०० ग्रामपंचायतीवर शिवसेना भाजपा युतीचा झेंडा फडकेल असा दावा खा. प्रतापराव जाधवांनी केला आहे. आज, २९ नोव्हेंबरला बुलडाणा येथे पत्रकारांशी  बोलतांना खा.जाधव बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा नवे चॅलेंज दिले आहे.

उद्धव ठाकरेंनी बुलडाणा लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावी असे खुले आव्हान खा. जाधव यांनी उद्धव ठाकरेंना काल दिले होते. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा नवे चॅलेंज उद्धव ठाकरेंना दिले आहे.  हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री  मी पहिला नाही असे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हणाले होते, त्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता उद्धव ठाकरेंना शेतीतल काय कळत? उद्धव ठाकरेंनी खरीप आणि  रब्बीच्या पिकांची यादी वाचवून दाखवावी मगच शेतकरी मेळावे घ्यावे असे खा. जाधव म्हणाले. शेतकरी आता आधुनिक झाला आहे,  फोर व्हीलर, टू व्हीलर शेताच्या बांधावर जात आहे. कुणी शेतकरी या नात्याने हेलिकॉप्टरने जात असेल तर आनंदच आहे असेही खा. जाधव म्हणाले.