शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश!; गुम्‍मीत महाआरोग्‍य शिबिरात शिवबंधन सोडले!!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा बुलडाणा तालुकाध्यक्ष सुनील देशमुख यांनी गुम्मी (ता. बुलडाणा) येथे काल, २७ मार्चला महाआरोग्य तपासणी शिबिर घेतले. शिबिराचा लाभ ३०३ रुग्णांनी घेतला. या वेळी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेच्या वैद्यकीय आघाडी उपतालुकाप्रमुख डॉ. योगेश नरोटे, रवी बोरकर व सहकाऱ्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.

शिबिरात स्वयंम फाऊंडेशन (बुलडाणा), गोदावरी फाऊंडेशन (जळगाव) येथून आलेल्या दीपक पाटील, तुषार सुरे यांच्यासह डॉक्‍टरांच्या टीमने रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. भाजपा बुलडाणा तालुक्याच्या वतीने आमदार सौ. श्वेताताई महाले यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

या वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील जाधव, प्रकाश पडोळ, माजी तालुकाध्यक्ष तेजराव पाटील धंदर, ज्‍येष्ठ नेते उत्तमराव नरोटे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील, फकिरा नरोटे, साहेबराव नरोटे, विश्वासराव देशमुख, नारायण पाटील धंदर, भोजराज पाटील शालिग्राम कानडजे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल जाधव पाटील, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष किरण पाटील धंदर, भाजपा तालुका उपाध्यक्ष गजानन जाधव पाटील, देवेंद्र पायघन, चिटणीस अरुण भोंडे, पुरुषोत्तम भोंडे, रवी धनावत, प्रकाश दांडगे, अनिल उबाळे, रवी काळे, समाधान पाटील धंदर, दीनानाथ राजगुरे, राजाराम पिंपळे, गणेश बारवाल, श्याम राजपूत, सुभाष राजपूत,  श्रीरंग पवार, हरिभाऊ उबाळे, शरद देशमुख, संजय झुंबड, अनिल गुळवे, अर्जुन लांडे, रामेश्वर आल्हाट, संतोष भगत, राजू अपार, सुभाष कदम, फिरोज बेग, तेजराव पाटील जाधव, सुनील जाधव, विठ्ठल नरोटे, सूर्यदेव काकडे, पंजाब हटकर, पंडित नरोटे, दिनकर नरोटे, शेख सादिक, मोईन पठाण, संतोष पालकर, भागवत पालकर, गजानन जाधव, नाना जाधव, दिलीप सुरडकर, डॉ. गजानन देवकर, रमेश भोपळे, सागर पवार पाटील, दिलीप सुरडकर, समाधान आघाव, संजय चांदा, गोपाल राजपूत, गोपाल तायडे, मधुकर गायकवाड, गजानन गायके, शेषराव कासोद, हिंमत भांबेरे, शेख सादिक, शेख शौकत, अरुण भोंडे, दशरथसिंग राजपूत, सतीश पाटील, सोपान जगताप, अभिषेक वायकोस तसेच सर्कल मधील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.