बुलढाण्यात उद्या शिवसेनेचा जंगी कार्यकर्ता मेळावा! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार प्रमुख मार्गदर्शन! पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांचे आवाहन
उद्या १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या मेळाव्याला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी संयुक्तरीत्या केले आहे. शिवसेना ही सत्तेसाठी नव्हे तर समाजासाठी आहे. जिल्ह्यात अधिक जोमाने शिवसेना संघटन मजबूत करण्यासह येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना उभारी मिळावी या दृष्टिकोनातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हा मेळावा उद्या शुक्रवारी गर्दे सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, भास्करराव मोरे छगनराव मेहेत्रे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या सत्कार सोहळा व मेळाव्यासाठी शिवसेना अंगीकृत संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी केले आहे.