शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवंत म्हणतात, जिल्ह्यातले दोन्ही आमदार शिंदेसोबत गेले तरी जिल्ह्यातली शिवसेना उद्धव साहेबांसोबत! आज पुन्हा पक्षप्रमुखांसोबत बैठक
Jun 25, 2022, 12:57 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातली संपूर्ण शिवसेना ही उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहे. जिल्ह्यातले तिन्ही जिल्हाप्रमुख व खासदार प्रतापराव जाधव सध्या मुंबईत आहेत. काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीला आम्ही हजर होतो. आज पुन्हा बैठकीला हजर राहणार आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी आज, २५ जून रोजी बुलडाणा लाइव्हला दिली.
"जिल्ह्यातले दोन्ही आमदार आणि खासदार जाधव जर शिंदे गटासोबत गेले तर तुम्ही कुठे असाल?" असा थेट प्रश्न बुधवंत यांना विचारला असता ते म्हणाले की खासदार प्रतापराव जाधव हे उद्धवसाहेबांसोबत आहेत. काल, झालेल्या खासदारांच्या बैठकीत ते हजर होते. बैठकीला १८ पैकी १६ हजर होते. मात्र दोन्ही आमदार जरी शिंदे गटासोबत गेले तरी आम्ही शिवसेना आणि उद्धवसाहेबांसोबतच राहू असे जालिंधर बुधवंत म्हणाले.