शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकरही राहुल गांधींच्या विधानावर संतप्त! म्हणाले, सावरकर देशभक्तीची प्रेरणा, राहुल गांधींनी तसे बोलायचे गरज नव्हती,आम्ही निषेध करतो

 
khedekar
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खा. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज, १८ नोव्हेंबरला जिल्ह्यात आहे. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानामुळे हिंदुत्ववादी  संघटना आक्रमक आहेत. मनसेचे राज्यभरातील हजारो कार्यकर्ते राहुल गांधीचा निषेध करायला शेगावात दाखल झाले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी देखील राहुल गांधींच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

 स्वातंत्र्यवीर सावरकरांचे त्याग, समर्पण विसरता येणार नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. सावरकर हे देशभक्तीची प्रेरणा आहेत. राहुल गांधीनी त्यांच्याबद्दल केलेले विधान आम्हाला मान्य नाही. राहुल गांधींना तसे बोलायची काहीच गरज नव्हती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा राहुल गांधींचे विधान मान्य होणार नाही. आम्ही या विधानाचा निषेध करतो असे नरेंद्र खेडेकर "बुलडाणा लाइव्ह" शी बोलताना म्हणाले.