शिंदे गटाला उमेदवारबी मिळू देणार नाय! निष्ठावान शिवसैनिकांचा शेगावात इशारा युक्त निर्धार !! बुलडाणा लाइव्ह ने दिली होती 'ब्रेकिंग'

 
yuy
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शिवसेनेतील महा बंडाच्या वादळामुळे उडालेला धुराळा आता खाली बसायला लागल्याच्या पार्श्वभूमीवर  असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील निष्ठावान पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक शेगाव येथे दणक्यात पार पडली. या बैठकीत बोलताना बहुतेक निष्ठावान सरदारांनी बंडाचा शिवसेनेवर यत्किंचितही परिणाम होणार नसल्याचे सांगून याउलट येणाऱ्या निवडणुकात शिंदे गटाला उमेदवार पण मिळणार नाही असा खळबळजनक दावा बोलून दाखविला.

यावेळी घाटावरील मोजकेच पण किरकोळ अपवाद वगळता घाटाखालील बहुतेक पदाधिकारी हजर होते. यामध्ये सहसंपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हा प्रमुख अविनाश दळवी, तालुका प्रमुख झाडोकार,  बहुतेक शहर, विभाग,  शाखा प्रमुखांचा समावेश होता. पुन्हा नव्या जोमाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांचे हात व शिवसेनेची ताकद वाढविण्याचा निर्धार या बैठकीत  करण्यात आला.

  याशिवाय बंडा नंतरची संघटनात्मक स्थिती, कोण आले व कोण गेले, कोण जाऊ शकते व येऊ शकते (का?) याचा आढावा आला. जिल्ह्याला मिळू शकणाऱ्या( संभाव्य) लाल दिव्या नंतर आणखी काही पडझड होऊ शकते यावर देखील चिंतन मनन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.