नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देउन शिंदे फडणविस सरकारने शब्द पाळला: आमदार श्वेताताईंचे प्रतिपादन

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आतापर्यंत अनेकदा कर्ज माफी दिल्या गेली . परंतू जे शेतकरी नियमित कर्ज घेऊन मुद्दल आणि व्याजाची नियमित कर्जफेड करतात त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणत्याही सरकारने कोणत्याही प्रकारे प्रोत्साहित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नव्हते. परंतु छ्त्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ही कर्ज माफीची घोषणा तत्कालिन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून लाखो शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. हा दिलासा केवळ कर्जदार शेतकऱ्यांनाच दिला होता असे नाही तर जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, व्याज भरतात त्या शेतकऱ्यांना कोणताही फायदा आता पर्यंत मिळाला नाही . नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मायबाप सरकार म्हणून काही तरी देणे लागते या भावनेतून  देवेंद्र फडणवीस  त्याचवेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. परंतु मध्यंतरी फडणवीस सरकार ऐवजी आघाडीचे सरकार आल्याने शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही. परंतु आता पुन्हा शिंदे, फडणविस सरकार येताच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणे प्रमाणे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून त्यांची दिवाळी गोड करणारे देशातील हे पहिलेच सरकार असल्याचे प्रतिपादन आ मदात श्वेताताई महाले पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ऑनलाईन प्रोत्साहन अनुदान वाटप कार्यक्रमात केले.

काल, २० ऑक्टोबरला नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदान जमा करण्याचा ऑनलाईन कार्यक्रम मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या ऑनलाईन कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पात्र शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना सुद्धा या प्रोत्साहित करणाऱ्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी आ. सौ. श्वेताताई महाले बोलत होत्या. 

बुलडाणा जिल्ह्यातील २१ हजार ६०० शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या प्रोत्साहन अनुदान योजनेचा बुलडाणा जिल्ह्यातील २१ हजार ६०० शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.चिखली विधानसभा मतदार संघातील चिखली तालुक्यातील १८३४तर बुलडाणा तालुक्यातील १८५० शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. आज पहिल्या दिवशी पहिल्या टप्प्यात जिल्हा भरातील ३००१ तर चिखली तालुक्यातील २४९ आणि बुलडाणा तालुक्यांतील ३७० शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदान जमा झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात नियमित कर्जफेड करणाऱ्या पद्मनाभ जगदेराव बाहेकार , संदिप प्रकाश बाहेकर, सुभाष किसनराव वानखेडे, रामदास आत्माराम वानखेडे या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

 यावेळी नवनियुक्त जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड, दिनेश गीते, नरेश हेड़ाऊ, संगमेश्वर बदनाळे, विक्रम पठारे, जिल्हा बँकेचे अशोक खरात, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख,ॲड. मोहन पवार, प्रकाश पाटील पडोळ,अरविंद होंडे, मंदार बाहेकर तथा जिल्हाभरातील प्रोत्साहन अनुदान योजनेतील पात्र लाभार्थी शेतकरी उपस्थीत होते.