शशिकांत खेडेकर मुख्यमंत्र्यांना भेटले! मुख्यमंत्र्यांनी लगेच केला बुलडाण्याच्या कलेक्टला फोन!

 
khedekar
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील सत्ता संघर्षानंतर नव्या सरकारने अनेक निर्णय घेण्याचा सपाटा लावलाय. स्वतः मुख्यमंत्री समस्या सोडविण्यासाठी लगेच अधिकाऱ्यांना फोन करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री शिंदेची भेट घेऊन त्यांच्या कानावर मतदारसंघातील समस्या टाकली अन् त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित ॲक्शन घेत बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून समस्या सोडविण्याचे तात्काळ आदेशही दिले.

सिंदखेडराजा शहरातील चांदणी तलावाच्या खचलेल्या भिंतीमुळे जनतेच्या जीवितास धोका निर्माण झालाय. त्यामुळे जनतेच्या मनात घबराट पसरली आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या या तलावाच्या  भिंतीचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. हीच बाब शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकली. त्यांना तसे निवेदनही दिले . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा त्यावर लगेच  ॲक्शन घेत बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला व तात्काळ भिंतीच्या दुरुस्तीचे आदेश  दिले.