सतिष गुप्तांचा राहुल बोंद्रेवर हल्लाबोल!; म्हणाले, चिखलीत फुकटचे श्रेय घेण्याचा फंडा सुरू
आमदार श्वेताताई महाले यांनी संसदीय आयुधांचा उपयोग करून विकासकामांसाठी निधी मंजूर करून आणतात. मात्र माजी आमदार या विकासाच्या कामांना विरोध करतात. जी कामे भाजपच्या प्रयत्नांतून होत आहे ती आम्हीच केली असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत असल्याचे सतिष गुप्त म्हणाले.
"चिखली नगरपालिकेची सत्ता द्या भाजपच्या हाती , वाढवू विकासाची गती असा शब्द तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी दिला होता. चिखली शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देवेंद फडणवीस यांनी दिला . या निधीतून चिखली शहरातील विकासाची अनेक कामे मार्गी लागती . मात्र या निधीतून ज्यांनी कमिशखोरी सुरू केली त्यांना भाजपने रस्ता दाखवला. चिखली शहराच्या विकासाठी आपण कटिबद्ध आहोत." असे प्रतिपादन आमदार श्वेताताई महाले यांनी यावेळी केले. यावेळी चिखली शहरातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.