आमदार श्वेताताई महाले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संतोष रनमोडेला अटक;भाजपा शहर अध्यक्ष पंडीतराव देशमुख यांचे प्रतिपादन!
अटक करण्यात आली असल्याचे भाजपा शहर अध्यक्ष पंडितदादा देशमुख यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. अटक करण्यात आलेल्या संतोष रणमोडेला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असल्याने सद्या तो पोलिस कोठडीत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबिनचे पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली असून फसवणुक करणाऱ्या रानमोडेला कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा देखील पंडीत दादा देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
आमदार श्वेताताई महाले यांनी पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन गुन्हे दाखल करून अटक करण्याची केली होती मागणी
संतोष रणमोडे याने चिखलीसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडून सोयाबिन विकत घेउन शेतकऱ्यांना त्यांचे पैसे न देता फरार झाला होता . याबाबत शेकडो शेतकऱ्यांनी अनेक पोलिस स्टेशन मध्ये तक्रारी केल्या होत्या . परंतु कोणत्याही पोलिस स्टेशन मध्ये त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला नव्हता .त्यामुळे आ सौ श्वेता ताई महाले यांनी पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांची बाधित शेतकऱ्यांसह
दि १७/६/२०२२ भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सदर प्रकरण आर्थिक फसवणुकीचे असल्याने आ सौ श्वेता ताई महाले यांच्या भेटी नंतर सदर प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करुन संतोष रनमोडे सह अशोक म्हस्के आणि निलेश सावळे यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० अन्वये कलम ४०६, ४०९,४२०,१२० ब, ३४ गुन्हे दाखल करण्यात आलेले होते . परंतु आरोपी संतोष रानमोडे फरार असल्याने त्याला अटक झालेली नव्हती . परंतू आ आ सौ श्वेता ताई महाले यांच्या सततच्या पाठ पुराव्यामुळे आरोपी संतोष यास कर्नाटक मधून अटक करण्यात आली.
अनेक पोलिस स्टेशनमध्ये शेकडो शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या आहेत तक्रारी
संतोष रानमोडे याने चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा , भोकरदन , जाफराबाद आणि इतर जवळच्या तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून संतोष रणमोडे याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जास्त दराचे आमिष दाखवून सोयाबिन आणि हरभरा उधारीवर विकत घेतलेले आहे. परंतु खरेदी केलेल्या सोयाबिन आणि हरभऱ्याचे पैसे न देता संतोष रणमोडे फरार झाल्याने शेकडो शेतकऱ्यांची फसवणुक केली होती. त्यामूळे चिखली , बुलडाणा आणि अन्य ठिकाणच्या पोलिस स्टेशनमध्ये संतोष रणमोडे व इतरांच्या विरोधात शेकडो शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत .
शेतकऱ्यांची फसवणूक सहन केली जाणार नाही: आमदार श्वेताताई
संतोष रणमोडे याने शेकडो शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशाला चुना लावला आहे . जास्त भावाचे आमीष दाखवून त्याने शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळें शेतकऱ्यांचा वर्ष भराची कमाई डूबल्याने बाधित शेतकरी हवालदिल झाला आहे. बळीराजाचे नाव घेऊन काही राजकीय पुढाऱ्यांनी शेतकऱ्याची बँक डूबविली, बाजार समितीची लूट केली. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याने आता यापुढे कुणीही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली सहन केली जाणार नसून शेतकऱ्यांनी सुद्धा कोणत्याही अमिषाला बळी न पडता यापुढे विश्वासू व्यक्तीलाच आपला माल द्यावा असे आवाहनही आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी केले आहे.