संजय राऊतांच्या तोंडाला सुटली खाज! रिंगोजन मलम लावण्याचा आ. गायकवाडांनी दिला सल्ला.

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संजय राऊत यांनी उठसूट सरकार एसआयटी लावते, या केलेल्या विधानावर आम.संजय गायकवाड यांनी प्रतिउत्तरात 'राऊतांच्या तोंडाला खाज सुटली असून त्यांना रिंगोजन मलम लावण्याचा सल्ला दिला आहे.

 ठाकरे गट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकार उठसूट एसआयटी लावते असे विधान केले आहे. या विषयावर बुलडाणा मतदार संघाचे शिंदे गट शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांनी प्रतिउत्तरात राऊतांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, राज्यात काही चुकीचे काम होत असेल तर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सदर प्रकरणी चौकशीची जबाबदारी आहे. एकीकडे एसआयटी लावून कारवाई केली नाही तर सरकार शेपूट घालून बसते असे नाव ठेवायचे आणि दुसरीकडे कारवाई सुरू केली की एसआयटीची खाज सुटली का?, असा प्रश्न करायचा, संजय राऊत हे विनाकारण टीका करतात. त्यांना काही धंदा उरला नाही. खरंतर राऊतांच्या तोंडाला खाज सुटली आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडाला रिंगोजन मलम लावण्याची गरज असल्याचा सल्ला आ.संजय गायकवाड यांनी प्रसार माध्यमांसमोर दिला.