SUNDAY SPECIAL! झेडपीच्या रणसंग्रामात ३४ जागांवर झुंजणार रणरागिनी! खुल्या १६ जागी रंगणार तुंबळ युद्ध..!!

 
jilhaparished
बुलडाणा (संजय मोहिते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बहुधा सप्टेंबर मध्ये होऊ घातलेल्या बुलडाणा  जिल्हापरिषद निवडणुकीच्या रणसंग्रामात कोण जिंकणार हे प्रत्यक्ष लढतीच्या वेळी देखील सांगणे कठीण ठरणार आहे. मात्र लढतीत बाजी मारणार आणि सभागृहात बहुमत राहणार ते जिजाऊ- सावित्रीच्या लेकींचेच ! याचे कारण ५० टक्के महिला आरक्षण हे होय. 

६८ सदस्यीय जिल्हा परिषद मधील ३४ जागा या महिलांसाठी राखीव आहेत. २८ जुलैला निघालेल्या सोडतीत महिला आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाले आणि अनेक दिग्गज पुरुष उमेदवारांचे राजकीय भवितव्य अस्पष्ट झाले! अर्थात आरक्षण मिळाले म्हणजे , गड जिंकला असे नव्हे तर रण रागिनींना वा त्यांच्या परिवाराला यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. यातही खुल्या प्रवर्गातील महिलासाठीच्या १६ आणि ओबीसींच्या ९ जिप गटातील लढती तुंबळ राजकीय युद्धच ठरणार आहे. बावनबीर( संग्रामपूर) , आळसना ( शेगाव) चांदुर बिसवा, निमगाव( नांदुरा) दाताळा ( मलकापूर) पळशी बुद्रुक, अटाळी( खामगाव) जानेफळ, देऊळगाव माळी, उकळी, अंतरी देशमुख( मेहकर) भोगावती, मेरा बुद्रुक( चिखली, मासरूळ( बुलडाणा) सुलतान पूर, पांगरा डोळे( लोणार) या खुल्या जागेतील लढती राजकीय युद्धच ठरणार आहे. ओबीसी महिलांच्या 9 गटामध्ये जामोद, आसलगाव ( जळगाव) चिंचाली कार फार्मा( शेगाव) दहिवडी ( नांदुरा) तळणी (मोताळा)


 उंद्री( ,चिखली),साखळी बुद्रुक( बुलडाणा) सिनगव जहांगीर( दे.राजा) शेंदुर्जन, सोनोशी( सिंदखेड राजा) गटांचा समावेश आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील ढालसावंगी( बुलडाणा) कुंबेफळ( खामगाव) पळशी झाशी( संग्रामपूर) शेलुद ( चिखली) देऊळगाव मही(दे राजा) पिंपळगाव राजा ( खामगाव) नरवेल( मलकापूर) हे गट आहे. जमाती साठी शेलगाव देशमुख( मेहकर) व कोथली( मोताळा) हे गट राखीव निघाले आहे. या ३४ गटात शेकडो महिला झेडपी मेम्बर होऊन सभागृहात जाण्यासाठी झुंजणार आहे. त्या ३४ भाग्यवान कोण याचा फैसला निकालाच्या दिवशीच होणार इतक्या चुरशीने यंदाच्या मिनी मंत्रालयाचा रणसंग्राम रंगणार आहे...