"कोश्यारी जनाची नाही तर मनाची लाज असेल तर राजीनामा द्या.!" राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने संतप्त! म्हणाले, छत्रपती शिवराय भूतकाळात,वर्तमानकाळात अन् भविष्यातही आदर्शच..

 
lahane
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. "शिवाजी पुराणे जमाने के आदर्श थे,नितीन गडकरी नये जमाने के आयडॉल है" असे विधान कोश्यारींनी केले होते.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांनी कोश्यारींच्या विधानाबद्दल संताप व्यक्त केला आहे.

राज्यपाल कोश्यारींनी त्यांच्या पदाची इज्जत घालवली आहे. हा राज्यपाल नव्हे तर भाज्यपाल आहे.  कोश्यारी जे बोलतात तो एका पक्षाचा अजेंडा आहे. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. राज्यपाल  कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधीत्व करीत नसतात. मात्र कोश्यारींना हे कळत नाही. जनाची नाही मनाची लाज वाटत असेल तर कोश्यारी राजीनामा द्या, अशा शब्दात लहाने यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातही आमचे आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाहीत. ते एकमेवाद्वितीय आहेत असेही दत्तात्रय लहाने यांनी म्हटले आहे.