पालिकांच्या १२१ प्रभागांचे आरक्षण सर्वानाच 'कुबूल'! एकही हरकत नाय !! आता मतदार यादी कार्यक्रमाची प्रतीक्षा
जिल्ह्यातील बुलडाणा, मेहकर, मलकापूर, खामगाव, नांदुरा, शेगाव ,जळगाव जामोद, देऊळगाव राजा व चिखली या ९ पालिकांची मुदत ३ जानेवारी २०२२ रोजीच संपली आहे. हद्दवाढ मंजूर झाल्याने चिखली वगळता ८ पालिकांची प्रभाग रचना अंतिम व प्रसिध्द करण्यात आली. यापैकी खामगाव, नांदुरा देऊळगाव राजा व जळगाव मध्ये प्रत्येकी १ प्रभाग तीन सदस्यीय आहेत. उर्वरित पालिकेत २ सदस्यीय प्रभाग असून त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. बुलडाणा १५ प्रभाग ३० सदस्य, मेहकर १३ प्रभाग २६ सदस्य, खामगाव १७ प्रभाग, ३५ सदस्य, मलकापूर १५ प्रभाग ३० सदस्य, जळगाव १० प्रभाग २१ सदस्य, नांदुरा १२ प्रभाग २५ सदस्य, शेगाव १५ प्रभाग ३० सदस्य आणि देउलगावराजा १० प्रभाग २१ सदस्य. दरम्यान १३ जूनला ओबीसी वगळता अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण मधील महिलांची सोडत काढण्यात आली.
२९ जून पर्यंत आयुक्त देणार मान्यता
सोडत प्रसिद्ध करण्यात आल्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्यासाठी १५ ते २१ जून दरम्यानची मुदत देण्यात आली होती. आले. मात्र एकही हरकत दाखल करण्यात आली नसून याचा अहवाल जिल्हाधिकारी २४ पर्यंत विभागीय आयुक्तांकडे सादर करणार आहे. २९ पर्यंत आयुक्त आरक्षणास मान्यता देतील.