बुलडाण्यात राहुल गांधींच्या पोस्टरला हाणल्या चपला ! भाजपचे शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा म्हणाले, स्वातंत्र्यवीरांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान, राहुल गांधींना जनाची नाही तर मनाची लाज पाहिजेत..!

 
juhy
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  खा. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल केलेल्या विधानामुळे हिंदुत्ववादी संघटनांसह मनसे, भाजपा चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनसेचे राज्यभरातील पदाधिकारी आज राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यासाठी शेगावात जमत आहेत. दरम्यान बुलडाणा शहर भाजपनेही राहुल गांधींच्या विधानाचा जोरदार निषेध केला असून राहुल गांधींच्या पोस्टरला चपला आणि बुटाने झोडपले आहे. भाजपचे जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक जयस्थंभ चौकात शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या नेतृत्वात भाजपने निदर्शने केली. यावेळी राहुल गांधींच्या पोस्टरला चपला व बुटांनी झोडपण्यात आले. पोलिसांनी काही काळ भाजप पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केले होते.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान विसरता येणार नाही. स्वतःच्या कुटुंबाची,मुलाबाळांची पर्वा न करता सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले. त्यांच्याकडून हजारो क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली. सावरकरांचे स्मरण करून आपले मस्तक अभिमानाने उंचावते मात्र ज्याला सुट्टया घालविण्यासाठी परदेशात जावेसे वाटते  अशा  व्यक्तीला सावरकरांच्या देशभक्ती बद्दल बोलण्याचा अधिकार नाही.  हा संपूर्ण प्रकार अतिशय घृणास्पद आहे.राहुल गांधींना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजेत. देशाला चुकीचा इतिहास सांगणाऱ्या राहुल गांधींना देश कधीच माफ करणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी दिली.

यावेळी भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश सचिव दिपक वारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा सौ.विजयाताई राठी ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील,भाजपा जिल्हा सचिव बाबासाहेब वरणगावकर,भाजपा तालुका सरचिटणीस ऍड.दशरथसिंग राजपूत, भाजपा शहर सरचिटणीस आशिष व्यवहारे,माजी नगरसेवक अरविंद होंडे, राजेश पाठक,माजी नगरसेविका सुभद्राताई इंगळे, भाजपा उपाध्यक्षा रंजनाताई पवार,  ॲड किरणताई राठोड,भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष वर्षाताई पाथरकर,शोभाताई ढवळे, भाजपा शहर उपाध्यक्ष नितीन बेंडवाल, सचिन टेंभिकर, नितीन श्रीवास,नितीन दासर,प्रीतेश बेदमुथा,भाजपा अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष आसिफभाई,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विनायक भाग्यवंत, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सोहम झाल्टे,भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस मोहित भंडारी,वैभव इंगळे,प्रदीप सोनटक्के,भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस धीरज जाधव,सचिन सुर्यवंशी,भाजपा सोशल मीडिया प्रमुख तेजस भंडारी,भाजपा जैन प्रकोष्ट शहराध्यक्ष शुभम कोठारी,अथर्व दारमोडे, अभिषेक देशमुख,रोहन देशपांडे, यश देशमुख,श्रीकृष्ण मख यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.