मासरुळ कालवा दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने सादर करा; आमदार श्वेताताईंच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना! " या कारणामुळे ४५० हेक्टर जमीन सिंचनापासून राहतेय वंचित..!
आज,१६ डिसेंबरला मासरुळ येथील पद्मावती धरणाच्या कालव्याव्दारे आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते पाणी सोडण्याचा शुभारंभ करण्यात आला.
त्यावेळी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एम. बी. मिरकुटे व कर्मचारी तसेच कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. कालव्याचे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुले व त्यावरील बांधकामांची तुटपुट झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवणे शक्य होत नाही .कालव्याची दुरुस्ती व धरणावरील झाडे झुडपे काढण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
यावेळी भाजपचे बुलडाणा तालुकाध्यक्ष ॲड सुनील देशमुख, प्रकाश पाटिल पडोळ, विष्णू वाघ, देवेंद्र पायघन, शरदराव देशमुख, अर्जुन लांडे पाटील, रामेश्वर आल्हाट, कलयाणराव देशमुख, देवराव कापरे, दीपक गुळवे ,गजानन आत्माराम वाघ, अरुण बोडखे, गणेश बोडके, संतोष भगत, श्रीराम पवार, नारायण साळवे , गुलाब शिंदे व समस्त भाजप पदाधिकारी मासरूळ आणि बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.