पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी आंदोलन करायला बुलडाण्यात! नरेंद्र मोदींबद्दल म्हणाले , माझा भावाने कोणतेही काम...
Dec 12, 2022, 18:43 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हो..बातमीच हेडिंग तुम्ही जे वाचलं ते खरच हाय.. दस्तरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद दामोदरदास मोदी आज,१२ डिसेंबरला बुलडाण्यात आले होते. स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनेचे अखिल भारतीय पदाधिकारी या नात्याने ते बुलडाणा येथे आले होते. बुलडाण्यात आयोजित राशन दुकानदारांच्या मोर्चाला त्यांनी संबोधित केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना राशन दुकानदारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे भाजपचे आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना प्रल्हाद मोदी म्हणाले की, हा सामान्य जनतेचा विजय आहे. पंतप्रधानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात येत असते,मात्र प्रल्हाद मोदींनी ही सुरक्षा नाकारली आहे,याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, माझ्या भावाने कोणतेही चुकीचे काम केलेले नाही, त्यामुळे कुणी मला मारेल अशी भीती नसल्याचेही ते म्हणाले.