चिखलीत रंगणार 'पैठणीचा खेळ!'आमदार श्वेता ताई महालेंचे दिमाखदार आयोजन;अभिनेत्री रेश्मा शिंदे यांचे प्रमुख आकर्षण

 
mahale
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत. हा सांस्कृतिक ठेवा आमदार श्वेता ताई महाले जपत जोपासत आहे.या पार्श्वभूमीवर 'चला खेळूया खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा' दिमाखदार सोहळा २२ जानेवारीला ४ ते ८ दरम्यान चिखलीतील सुपर गेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे 'रंग माझा वेगळा' या मालिकेतील अभिनेत्री रेश्मा शिंदे ह्या प्रमुख आकर्षण राहतील. त्यांच्या हस्ते बक्षीसांची लयलूट होणार आहे.

आ.श्वेताताई महाले पाटील या आमदार होण्यापूर्वी व झाल्यानंतर सुद्धा चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक सणवार हा सार्वजनिक स्वरूपात राबवितात. त्या राखी पौर्णिमेच्या दिवशी चिखली विधानसभा मतदारसंघातील जवळपास ८० हजार घरांमध्ये राखी  पाठवीतात. दहीहंडी कार्यक्रम सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यावर्षी  मकर संक्रांतीच्या निमित्ताने 'चला खेळूया,खेळ पैठणीचा,सन्मान नारी शक्तीचा' हा विरंगुळात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण 'रंग माझा वेगळा' फेम लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत चिखलीत हळदी कुंकू समारंभ व विविध स्पर्धा होणार होतील. आधार बहूउद्देशीय संस्था व तोरणा महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी मर्यादित बुलडाणा च्यावतीने महिला, भगिनींना या खेळात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

महिलांसाठी ३ स्पर्धा रंगणार

 स्पर्धा - १ :  
पहिले बक्षिस मानाची पैठणी, दुसरे बक्षिस चांदीचे पैंजण, तिसरे बक्षिस चांदीचा शिक्का, चौथे व पाचवे बक्षिस चांदीचे जोडवे.

 स्पर्धा - २:  
पहिले बक्षिस सोन्याची नथ, दुसरे बक्षिस चांदीचे पैंजण, तिसरे बक्षिस चांदीचा शिक्का, चौथे व पाचवे बक्षिस चांदीचे जोडवे.
 
स्पर्धा - ३:  
पहिले बक्षिस सोन्याची नथ, दुसरे बक्षिस चांदीचे पैंजण, तिसरे बक्षिस चांदीचा शिक्का, चौथे व पाचवे बक्षिस चांदीचे जोडवे.

वीर माता,वीर पत्नी यांचा होणार सन्मान

 देशासाठी ज्या सुपुत्रानी हौतात्म्य पत्करले  अशा चिखली विधानसभा मतदार संघातील त्या वीर पुत्रांच्या वीरमाता आणि वीरपत्नी यांचा सुद्धा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.