POLITICAL BREAKING! 8 ग्रामपंचायतींची 18 ला निवडणूक; पब्लिक थेट निवडणार सरपंच!! 24 पासून नामांकन

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राज्यातील 608 ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा मुहूर्त जाहीर झाला असून  यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 8 ग्राम पंचायतीचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमात सरपंच पदाची निवडणूक थेट पब्लिकमधून होणार आहे.

यामध्ये चिखली तालुक्यातील नायगाव  खुर्द, किन्ही नाईक, डोंगरगाव, लोणार मधील पिंपळखुटा, किन्ही, जळगाव जामोद मधील भिंगारा, संग्रामपूर मधील सायखेड, नांदुरा मधील हिंगणा  भोटा ग्राम पंचायतीचा समावेश आहे. 18 ऑगस्टला तहसीलदार निवडणूक ची नोटीस जारी करतील. 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान ( सुट्टीचे 3 दिवस वगळून) उमेदवारी अर्ज सादर करता येतील. 2 सप्टेंबर ला छाननी करण्यात येणार असून 6 तारखेला दुपारी 3 पर्यंत माघार घेता येईल. त्यानंतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. 18 ला सकाळी 7.30 ते 5.30 दरम्यान मतदान पार पडणार आहे. रिंगणातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला 19 सप्टेंबर ला होणाऱ्या मतमोजणी अंती होणार आहे.