गुरुपौर्णिमा निमित्त गुरुतुल्य श्रीमती सुशीलाबाई लंकेंचा सन्मान हे माझे भाग्य;आ.सौ श्वेताताई महाले पाटील

 
चिखली : माजी विधानपरिषद सदस्य म्हणून दिवंगत माजी आमदार स्व. दत्तात्रय (नाना) साहेब लंके यांच्या निधनानंतर राज्य शासनाच्या वतीने त्यांच्या अर्धांगिनी  श्रीमती सुशीलाबाई दत्तात्रय लंके यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार या नात्याने चिखली विधान सभा मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने हे स्मृति चिन्ह माझ्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला हे मी माझे भाग्य समजत असल्याचे प्रतिपादन आ. सौ श्वेताताई महाले पाटील यांनी केले.  काल, गुरुपौर्णिमेनिमित्त माजी विधान परिषद सदस्य दिवंगत दत्तात्रय (नाना) लंके  यांच्या पत्नीकडे त्यांनी स्मृती चिन्ह प्रदान केले   यावेळी त्या बोलत होत्या.

महाराष्ट्र शासनाच्या सांसदीय कार्य विभागाच्या वतीने माजी विधान परिषद सदस्य स्व .दत्तात्रय नाना लंके यांच्या मृत्यु पश्चात त्यांना स्मृती चिन्ह देण्यात आले. हे स्मृती चिन्ह त्यांच्या पत्नी श्रीमती सुशीलाबाई दत्तात्रय लंके यांनी उपविभागीय अधिकारी बुलडाणा राजेश्वर हांडे , तहसीलदार डॉ. अजितकुमार  यांच्या उपस्थितीत स्वीकारले. 

स्व. नाना लंके साहेब यांचे कार्य प्रेरणादायी

स्व. दत्तात्रय नाना लंके  हे हाडाचे शिक्षक होते. आदर्श विद्यालय चिखली येथे त्यांनी अनेक पिढ्या घडविल्या. १९७८ ते १९८४ पर्यंत त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात शिक्षक आमदार म्हणून चिखलीचे नेतृत्व केले आहे. तसेच त्यांनी शिक्षण प्रसारक
मंडळाचे माजी सचिव , तथा संचालक, शिक्षक
परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून ही कार्य केले आहे. 
स्व दत्तात्रय एकनाथ उपाख्य नानासाहेब लंके यांचे २८ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन
झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९३ वर्षे होते. देवगिरी तरुण भारतसाठी अनेक वर्षे पत्रकार म्हणून ही त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी अनेक क्षेत्रात काम करुन प्रत्येक क्षेत्रात वेगळा उमटविला असल्याने त्यांचे कार्य  प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार श्वेताताई महाले  पाटील म्हणाल्या.


 या वेळी भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष रामकृष्ण शेटे,रामदास देव्हडे, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे, भाजपा अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष शेख अनिस, व्यापारी आघाडी प्रदेश सचिव अशोक अग्रवाल, सलीम परवेझ, सुभाष अप्पा झगडे, महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. सुनीता भालेराव, पवन लढ्ढा, गोविंद देव्हडे, रेणुकादास मुळे, शैलेश सोनूने, अनमोल ढोरे, सौ. कविताताई लंके, श्याम वाकदकर, सरचिटणीस युवराज भुसारी, निरज काकडे, भारत दानवे, तलाठी गिरी, सरचिटणीस महेश लोणकर, संतोष खबुतरे आदी उपस्थित होते.