आमदार श्वेताताई महालेंच्या वतीने उद्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार! हवामान तज्ञ पंजाब डख करणार मार्गदर्शन

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्यावतीने नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. उद्या,२४ नोव्हेंबरला दुपारी ११ वाजता  चिखली येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या भव्य सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.  

या भव्य सोहळ्यासाठी जागतिक कीर्तीचे हवामान तज्ञ पंजाब डख यांची उपस्थिती लाभणार असून त्यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला कोणतेही पक्षीय बंधन नाही, नवनिर्वाचित सर्वच सरपंच व सदस्यांचा हा सत्कार होणार आहे.  या कार्यक्रमाला सर्व नवनियुक्त सरपंच, सदस्य व नागरिकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन करण्यात आले आहे.