आता ठरल! आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढणार! महाविकास आघाडीच्या बैठकीत झाला निर्णय; तिन्ही पक्षाचे नेते बुलडाण्यात एकवटले

 
ssss
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथील विश्रामगृहात पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या निर्णायक बैठकीत आगामी सर्व निवडणुका एकत्रितपणे अर्थात आघाडीवर लढण्याचा निर्धार करण्यात आला.माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे  यांच्या अध्यक्षतेखाली बुलडाण्यात महविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीत येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित लढणार असल्याचा निर्धार सर्वानुमते घेण्यात आला. जिल्ह्यातील अवैध धंद्याच्या बाबतीत लवकरच एकत्रित आंदोलनाची भूमिका घेण्यात आली. शिवसेनेच्या सत्कार समारंभातील भ्याड  हल्ल्याचाही  यावेळी निषेध करण्यात आला.

 बैठकीला आमदार राजेश एकडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष  राहुल बोंद्रे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत,  राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत भोजने, सहसंपर्कप्रमुख छगन मेहेत्रे , राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष टी. डी. अंभोरे पाटील,माजी जिल्हाप्रमुख धीरज लिंगाडे, काँग्रेसचे  अशोक पडघान , शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे,  राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष नरेश शेळके, तालुकाध्यक्ष डी.एस. लहाने, महिला  आघाडी जिल्हा अध्यक्ष.

अनुजा सावळे,  जिल्हा सरचिटणीस पी.एम.जाधव, शिवसेनेचे विधानसभा संघटक अशोक इंगळे, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक अतुल लोखंडे, राष्ट्रवादीचे बी.टी.जाधव, नाजिमा खान, शिवसेना तालुकाप्रमुख लखन गाडेकर, नंदू कराडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर, काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस, शिवसेना शहरप्रमुख हेमंत खेडेकर,महादेवराव शेळके, अनिल वर्मा, बबलु कुरेशी, निलेश राठोड, सचिन परांडे,  सत्तारभाई, आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.