बातमी सिंदखेडराजाहून! उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांच्या प्रश्नावर भडकले, म्हणाले मला "तसले" प्रश्न विचारू नका! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकितील आघाडीबद्दल महत्वपूर्ण विधान.!

 
सिंदखेडराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज, २१ मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. सकाळी साडेनऊला ते सिंदखेडराजा येथे पोहचले. जिजाऊ जन्मस्थळी नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. दुपारी दोनला  सिंदखेडराजा येथील पंचायत समिती सभागृहात विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर जळगाव जामोदला रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला..एका प्रश्नावर ते जाम भडकले. मला तसले प्रश्न विचारू नका. मला विकासाचे प्रश्न विचारा. मला त्याच्यात इंटरेस्ट आहे असे ते म्हणाले.



  
सिंदखेडराजा शहराला मोठा इतिहास लाभला आहे. या शहराला हेरीटेज दर्जा देऊन त्याच दर्जाची गुणवत्तापूर्ण कामे झाले पाहिजेत असे अजित पवार म्हणाले. ए .आर. अंतुले मुख्यमंत्री असल्यासुन या शहराला अल्पनिधी पलीकडे काही मिळाले नाही. परंतु आता टप्याटप्याने शहर विकासासाठी निधी देणार असल्याचे अजित पवार म्हणाले. शरद पवार यांनी ब्राम्हण महासंघासोबत बैठक बोलावल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यात ते चांगलेच भडकले.

शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत. कधी काय करायचं याचा निर्णय ते योग्य पद्धतीने घेतात. मला असले प्रश्न विचारू नका. मला विकासाचे प्रश्न विचारा, त्यात मला जास्त रस आहे असेही अजित पवार म्हणाले.  राज्यात आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवण्यावर चर्चा झाली आहे. मात्र याबाबतचा निर्णय हा जिल्हापातळीवर घ्यायचा असल्याचे त्यांनी सरळ सांगून टाकले. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी यापुढील सर्वच  निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचे विधान केले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राऊत यांच्या विधानाशी विरोधाभास असलेले वक्तव्य केल्याने नेते आणि कार्यकर्ते सारेच संभ्रमात आहेत.