चिखलीत राष्ट्रवादीला भगदाड! आमदार श्वेताताईंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

 
hgfh
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  चिखली शहरांतील सरस्वती नगर येथिल राष्ट्रवादीचे सचिन लोखंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस तथा चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपामध्ये प्रवेश घेतला. या प्रवेशामुळे चिखली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे भगदाड पडले आहे.

आज, १० सप्टेंबरला र चिखली विधानसभा मतदारसंघाच्या    आमदार  श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या या प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादीच्या अनिल वानखेडे, अमोल लोखंडे, सुभाष भराड, अतुल शेलार, भागवत वानखेडे , गजानन भराड,  लक्षण नेवरे, अश्विन मलबार, शरद मलबार, मुन्ना कऱ्हाडे, समाधान मलबार परमेश्वर फोलाने, अशोक गोलांडे, कडूबा भूतेकर , गोपल ठेंग, लक्ष्मण लहाने, शुभम वानखेडे, श्याम ठेंग यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला..

 यावेळी भाजप नेते  रामदास  देव्हडे, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष  कृष्णकुमार सपकाळ , माजी नगराध्यक्ष  सुहास शेटे, नगरसेवक गोविंद देव्हडे, सुभाष अप्पा झगडे , प्रा. वीरेंद्र वानखेडे ,  सौ शकुंतला बाहेकर,युवराज भुसारी , हरिभाऊ परिहार, ॲड. संजीव सदार, सागर पवार ,शंकर देशमाने , कमलकिशोर लांडगे यांची उपस्थिती होती.