इसरुळ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा; सतीश भुतेकर झाले सरपंच
Dec 20, 2022, 12:16 IST
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील चर्चेत असणाऱ्या इसरुळ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने कब्जा केला आहे. आधी ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश अण्णाराव भुतेकर हे सरपंचपदी विराजमान झाले असून शिवसेनेचे संतोष शेनफड भुतेकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. सतीश भुतेकर ३९३ मतांनी विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत हा मोठा विजय मानल्या जात आहे.