राष्ट्रवादीने रोखला बुलडाण्यात रस्ता!जयंत पाटलांच्या निलंबनाचा निषेध; तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहानेंच्या नेतृत्वात झाले आंदोलन
Dec 23, 2022, 20:02 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांचा हिवाळी अधिवेशनात आवाज दडपण्याचा प्रयत्न आणि त्यांना अधिवेशनापुरते निलंबित करण्याच्या निषेधार्थ बुलडाणा राष्ट्रवादीकडून येथील संगम चौकात रास्ता रोको करण्यात आला.
हिवाळी अधिवेशनात प्रांताध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांना अधिवेशनापुरते निलंबित करण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांनी त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप होतो आहे. त्याचे सर्वत्र पडसाद असून बुलडाण्यातही आज रास्ता रोको च्या निमित्ताने निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. राज्य सरकारचा निर्लज्जपणाचा कहर.. जयंत पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी... भ्रष्टाचारी सरकार हाय हाय.. अशा घोषणाबाजीने संगम चौक दणाणला होता. यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे बुलडाणा तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने,अनिल बावस्कर,शाहीना पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते रास्ता रोको निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.