चिखलीत काँग्रेसचा अतिक्रमण धारकांसाठी नगर परिषदेवर धडक मोर्चा! माजी आ.राहुल बोंद्रे म्हणाले,गोरगरिबांच्या हक्काच्या जागेसाठी काँग्रेस सदैव पाठीशी;

गोरगरीबांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही म्हणाले; कुणाल बोंद्रे म्हणाले, कारवाई सूडबुद्धीने..!

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  चिखली नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शहरातील शेकडो अतिक्रमण धारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या कारवाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखली शहर काँग्रेसच्या वतीने नगर परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. अतिक्रमण धारक नागरिक  तसेच  लघु व्यावसायिकांच्या मागण्या मान्य करण्यात याव्या. त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. ज्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत त्या मागे घेण्यात याव्या अशी मागणी करून  गोरगरिबांच्या हक्काच्या जागेसाठी काँग्रेस सदैव पाठीशी आहे. गोरगरिबांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा शब्द माजी आ.राहुल बोंद्रे यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना दिला. यावेळी त्यांनी भाजपा आणि नगरपरिषद प्रशासनाचे धोरण दुट्टपी असल्याचा आरोप केला. चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी स्थानिक आमदारांच्या दबावाखाली काम करीत असल्याचेही यावेळी राहुल बोंद्रे म्हणाले. राजकीय भेदभाव करून काही अतिक्रमण धारकांनाच नोटिसा पाठवल्याचेही ते यावेळी म्हणाले.

धनदांडग्यांचे अतिक्रमण कायम असताना  सर्वसामान्य गोरगरिबांना नोटीस पाठवणे कितपत योग्य असा सवाल चिखली काँग्रेसचे शहराध्यक्ष अतहरोद्दिन काझी यांनी यावेळी केला.  उम्र बित जाती है एक घर बनाने मे , तुम तरस नही खाते बस्तिया उजाडने मे असे म्हणत कुणाल बोंद्रे यांनी नगर परिषद प्रशासनाची कारवाई सूडबुद्धीने असल्याचा आरोप केला.  शहरातील माझ्या परिवारावर संकट असल्याने वाढदिवस साजरा करणे योग्य वाटत नसल्याचेही कुणाल बोंद्रे म्हणाले. यावेळी डॉ.मोहम्मद इसरार, निलेश अंजनकर, प्रदीप पचेरवाल यांचीही भाषणे झाले. चिखली शहरातील हिंदूसूर्य  महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळुन या धडक मोर्चाला सुरुवात झाली होती.

विलास कंटुले, गोकुळ शिंगणे, गोपाल देव्हडे, विजय गाडेकर, अनिखॉ उस्मानखॉ, राहुल सवडतकर, जय बोंद्रे, प्रशांत देशमुख, सुरेश बोंद्रे, सचिन शेटे, आश्विन जाधव, कैलास जंगले, शहजादअली खान, खलील बागवान, शिराज काझी, शेख आरिफ, अब्रार  बागवान, अमोल सुरडकर, भास्कर चांदोरे, आकाश गाडेकर, पवन रेठे, अजय गवारगुरू, अकील खान, समद जमदार, अक्रम बागवान, सागर खरात यांच्यासह चिखली शहरातील शेकडो नागरिक,लघु व्यावसायिक या मोर्चात सहभागी झाले होते.