केंद्राच्या विरोधात चिखली कॉंग्रेस उतरली रस्त्यावर! निषेध नोंदवित राष्ट्रपतींना घातले साकडे!!

 
gjgvn
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रीय कॉग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनीया गांधी यांच्याविरूध्द ईडी सारख्या सरकारी यंत्रणांना हाताशी धरून खोटे आरोप पत्र दाखल करून त्यांना वारंवार चौकशीला बोलविले जात आहे. त्यांची प्रकृती आणी देशाप्रती त्यांच्या कुटूंबियांनी दिलेले योगदान पाहता या अन्यायकारक कारवाई विरोधात आज,  26 जुलै रोजी  जिल्हा कॉग्रेस चे अध्यक्ष  राहुल बोंद्रे यांच्या सुचनेनुसार चिखली शहर व तालुका कॉंग्रेसने तहसिलदार यांच्या मार्फत  राष्ट्रपती यांना निवेदन दिले आहे.

निवेदनानुसार केंद्रातील मोदी सरकार राजकीय सुडबुध्दीने श्रीमती  गांधी यांना लक्ष्य करीत आहे. चुकीचे निर्णय व चुकीची धोरणं यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलीत करण्यासाठी कॉंग्र्रेस नेत्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. देशातील हे सरकार हुकुमशाही कडे वाटचाल करीत असुन केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करीत आहे. श्रीमती  गांधी यांना ईडी कार्यालय जोवर मुक्त करीत नाही तोवर  सत्याग्रह करीत राहु असा ईशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.