उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी चिखलीत शिवसैनिकांची मोटारसायकल रॅली! तालुकाप्रमुख म्हणतात चिखली तालुक्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबतच

 
चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कुणी कोणत्याही गटात गेले तरी निष्ठावान सामान्य शिवसैनिकांवर कोणताही फरक पडणार नाही. चिखली तालुक्यातील तळागाळातील सामान्य शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सोबतच असल्याचे शिवसेनेचे चिखली तालुका प्रमुख कपिल खेडेकर यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त चिखली शहरातून शिवसैनिकांची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत चिखली तालुक्यातील शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

कौन चले भाई कौन चले शिवसेना के वीर चले! शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी चिखली शहर दणाणून गेले होते. जिल्हा सहसंपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या निवासस्थाना वरून ही रॅली काढण्यात आली. संपूर्ण चिखली शहरातून काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे दिसत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.