उद्या मेहकर व लोणार तालुका काँग्रेस कमिटीची बैठक; भारत जोडो यात्रेच्या तयारीसाठी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे घेणार बैठक; उपस्थित राहण्याचे तालुकाध्यक्ष देवानंद पवार यांचे आवाहन..!

 
मेहकर( अनिल मंजुळजर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभारत सर्वच स्थरांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांची ही यात्रा लवकरच बुलडाणा जिल्ह्यात दाखल होणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.दरम्यान उद्या ४ नोव्हेंबर रोजी मेहकर व लोणार तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

उद्या ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कृषीवैभव लॉन येथे ही बैठक होणार असून या बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघातील  सर्वच आजी - माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक , काँग्रेस सेल व काँग्रेसच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन  मेहकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी केले आहे.